राहुल गांधींची कॉपी करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न फसला

नागपुरातील जेन-झीचा कार्यक्रम फोल ठरल्याचा दावा

मुंबई /23 ऑगस्ट: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. राहुल गांधी यांची तरुणाईमध्ये वाढती क्रेझ लक्षात घेऊन भाजपानेही त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुण्यातील महिला विशेष छात्रों की गुंज कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशामुळे आपणही जेन-झी बरोबर संवाद साधू या भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात कार्यक्रम घेतला पण तो सुपरफ्लॉप ठरला. फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या जेन-झी संवाद कार्यक्रमावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राहुल गांधी हे समाजातील सर्व घटकांशी संवाद साधत आहेत. भारत जोडो यात्रा ही त्याचाच एक भाग होती. सध्या विद्यार्थ्यांचा, शिक्षणाचा मुद्दा घेऊन ते छात्रों की गुंज हा कार्यक्रम करत आहेत. राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम राजकीय नसून फक्त तरुणाईशी संवाद साधण्याचा, त्यांचे विचार, दुःख, प्रश्न जाणून घेण्यासाठी हे व्यासपीठ आहे. तरुणवर्गाचा या अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच आपणही कार्यक्रम करु असे ठरवून त्यांनी सर्व सरकारी यंत्रणांचा वापर केला पण जेन झी ने त्याकडे पाठ फिरवली. नक्कल करायलाही अक्कल लागते, असा टोला सपकाळ यांनी लगावला.

संबंधित बातम्या

Back to top button