खाटीक समाज परिवर्तन संघटनेच्या रुग्णवाहिका व शववाहिकेचे लोकार्पण
समाजबांधवांच्या योगदानातून रुग्णसेवेसाठी दोन वाहने उपलब्ध

अमरावती /14 ऑक्टोबर : खाटीक समाज परिवर्तन संघटनेच्या वतीने समाजबांधवांच्या सेवेसाठी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिका व शववाहिकेचे हस्तांतरण सोमवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
अस्पा बँडसन मारोती शोरूमच्या संचालकांच्या हस्ते संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी माणिकराव नेहर व शालिकराम कंटाळे यांच्याकडे दोन्ही वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.नगरसेविका सुनीता लोणारे यांच्या हस्ते वाहनांचे पूजन करण्यात आले. यावेळी समाजातील पदाधिकारी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खाटीक समाज परिवर्तन संघटना सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असून,खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी पाठ पुरावा, वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह सोहळे, विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच समाजबांधवांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासारखे विविध उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येतात. समाजबांधवांच्या योग दानातून आणि आग्रहास्तव ही दोन्ही वाहने उपलब्ध झाली असून,ती समाजाच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आली आहेत.या उपक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर हरणे,किशोर दुर्गे, विठ्ठल मदने तसेच सर्व पदाधिकार्यांनी विशेष पुढाकार घेतला. या प्रसंगी विजय विल्हेकर,दीपक धनाडे,शंकर मंडवे, त्रिशूल धनाडे, सुरेश माहुरे, रामेश्वर माहुरकर,सुभाष लोणारे, मोहन नेहर, सतीश माहुरे, गजानन कंटाळे, प्रमोद हरणे,भास्कर माहुरकर, गजानन खंडारे,संजय माहुरकर, शरद लोणारे,मनोहर पारवे, वी पारवे,गजानन माहुरकर, गुणवंत माहुरकर यांच्यासह अनेक समाजबांधव व पदाधिकारी उपस्थित होते.





