आता पंतप्रधान मोदी व मेलोनी प्रिंटेड साडीच्या पदरावर अन् बॉर्डरीवर
आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या मैत्रीचे किस्से अन् मीम्स नेहमीच चर्चेत...

इंटरनेटवर गाजणार्या मेलोडी ट्रेंडच्या कापडाची बाजारात मागणी
बंधानी साडीवर डिजिटल फोटोंची सर्वत्र चर्चा
नवी दिल्ली/20 ऑगस्ट – सोशल मीडियावर भारत अन् इटलीच्या मैत्रीचे किस्से, गमतीशीर व्हिडिओ भलतेच गाजत असताना आता थेट कापड बाजारात एकच नवीन धमाका झालाय. इंटरनेटवर तुफान गाजणार्या ’मेलोडी’ ट्रेंडचा फायदा घेत कापड व्यापार्यांनी थेट भारत अन् इटलीच्या नेत्यांचे फोटो छापलेली साडी बाजारात आणली असून ग्राहकांची ही साडी घेण्यासाठी बाजारात तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ज्या दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या मैत्रीचे किस्से अन् मीम्स नेहमीच चर्चेत असतात, त्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची हवा आता थेट कापड दुकानात अन् ग्राहकांच्या पसंतीत पाहायला मिळत आहे. इंटरनेटवरील या भन्नाट ट्रेंडचा अंदाज घेऊन व्यापार्यांनी थेट ’मोदी-मेलोनी प्रिंटेड साडी’ बाजारात विक्रीसाठी आणली असून सर्वत्र याच साडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कापड बाजारातील व्यापार्यांनी या दोन्ही मोठ्या आंतरराष्ट्रीय नेत्यांचे डिजिटल फोटो छापलेली एक भलतीच खास अन् हटके साडी बाजारात उतरवली असून, सध्या या साडीचा व्हिडिओ सोशल मीडियावरचांगलाच व्हायरल होत आहे. कापड दुकानात आलेल्या ग्राहकांना ही नवीन साडी दाखवतानाचा अन् त्या साडीबद्दल माहिती सांगतानाचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर भलताच पसंत केला जात आहे. दुकानात आलेल्या हिरव्या रंगाच्या पारंपरिक बंधानी साडीवर दोन्ही नेत्यांचे सुरेख अन् अत्यंत स्पष्ट फोटो छापण्यात आले आहेत. या साडीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे या साडीच्या पदरावर अन् चारही बाजूंच्या बॉर्डरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे वेगवेगळे सुंदर फोटो एकाच फ्रेममध्ये बसवले आहेत.इंटरनेटवर गाजलेल्या ’मेलोडी चॉकलेट’ अन् इतर गमतीशीर मीम्सचा संदर्भ घेऊन ही भलतीच वेगळी अन् आकर्षक डिझाइन तयार करण्यात आली आहे. साडी विकणार्या दुकानदारांच्या सांगण्यानुसार, ही फक्त साध्या डिझाइनची साडी नसून एक नवीन अन् उच्च दर्जाची डिझाइनर साडी आहे. ही साडी फक्त एकाच हिरव्या रंगात उपलब्ध नसून लाल, पिवळा, जांभळा, गुलाबी अशा इतरही अनेक भडक अन् सुंदर रंगांमध्ये दुकानांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. ग्राहकांना आपल्या आवडीनुसार रंग निवडण्याची सोय असल्याने दुकानांमध्ये महिलांची खरेदीसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.
कापड बाजारात ही साडी विक्रीसाठी येताच महिला अन् विशेषतः तरुण मुली या साडीला भरपूर पसंती देत आहेत. दुकानांमध्ये ही साडी प्रत्यक्ष पाहण्यासाठी अन् खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमू लागली आहे. सोशल मीडियावरील डिजिटल ट्रेंडचा अशा प्रकारे कापड बाजारात उपयोग करून व्यापार्यांनी एक नवीनच व्यवसाय निर्माण केला आहे. सध्या ही ’मोदी-मेलोनी’ प्रिंटेड साडी सोशल मीडियावरून थेट लोकांच्या घराघरांपर्यंत पोहचून कापड बाजारात अन् सर्वसामान्य नागरिकांमध्ये एकच चर्चेचा विषय ठरली आहे.




