‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात सर्वांना प्रवेश

माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची पत्रकार परिषदेत माहिती

मात्र मुलींना प्राधान्य दिले जाणार

पुणे /19 ऑगस्ट  : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यात मुलींचा आवाज ऐकला गेला पाहिजे. पेपरफुटीसह मुलींच्या काही समस्या आहेत. त्यामुळे ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राजस्थानाच्या माजी मंत्री रेहाना चिस्ती, माजी मंत्री सतेज पाटील, प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष दीप्ती चवधरी, प्रशांत जगताप, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, के. बी. बैजु, मनोज त्यागी, , गोपाळ तिवारी उपस्थित होते.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, “राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मुलींनी नोंदणी केली आहे. पुणे शहरात राहुल गांधी आणि विद्यार्थ्यांमध्ये संवादाचा दुवा निर्माण होणार आहे. मुलींचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्याच पुण्यात मुलींचा आवाज ऐकला पाहिजे. कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेशाची संधी आहे. मात्र, मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे.”पेपरफुटी, स्पर्धा परीक्षांमधील अनियमिता, वाढता शैक्षणिक खर्च आणि बेरोजगारी या प्रश्नांकडे राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘छात्रों की गूंज’ अभियान 22 ऑगस्ट रोजी एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता पुण्यात होणार आहे.लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button