पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनीचे इंग्लिश स्टोरी रायटिंग स्पर्धेत यश

अमरावती /4 ऑगस्ट: पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी सौम्या पाटील हिने इंटर-स्कूल स्तरावरील इंग्लिश स्टोरी रायटिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सौम्याने आपल्या कल्पकतेचा, उत्कृष्ट इंग्रजी भाषाशैलीचा आणि प्रभावी लेखनकौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार सादर करत हे यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे प्राचार्य सचिन दुर्गे, उपप्राचार्या सोनल निस्ताने, तसेच सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

Back to top button