खासगी वाहनांवर ‘पोलीस’ लिहून रुबाब झाडणे आता पडणार महाग

हायकोर्टाच्या नाराजीनंतर महाराष्ट्र पोलीस कडक, संपूर्ण राज्यात कडक निर्देश जारी

अमरावती /दि. 5 – खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर लाल अक्षरांत ’पोलीस’ लिहून रुबाब झाडणार्‍या पोलिसांवर आणि कर्मचार्‍यांवर आता थेट कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात येतील. महाराष्ट्र पोलिसांच्या वाहतूक विभागाने या प्रथेला गांभीर्याने घेत राज्यभरात कडक निर्देश जारी केले आहेत. आता कोणत्याही खासगी वाहनावर ’पोलीस’ची पाटी किंवा ओळखचिन्ह लावून वाहन चालवताना आढळल्यास केवळ दंडच आकारला जाणार नाही, तर फौजदारी कारवाईही केली जाईल. हा निर्णय त्या तक्रारींनंतर घेण्यात आला आहे, ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला होता की खासगी वाहनांवर ’पोलीस’ लिहून काही लोक कायदा अंमलबजावणी एजन्सींच्या ओळखीचा गैरवापर करत आहेत. यामुळे केवळ सामान्य नागरिकांमध्ये भीती आणि दबावाचे वातावरण निर्माण होत नाही, तर अनेकदा बेकायदेशीर हालचालींनाही संरक्षण मिळण्याची शक्यता असते.
मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली होती तक्रार-मिळालेल्या माहितीनुसार, नागरिक सखाराम कुलकर्णी यांनी 27 जून 2026 रोजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत खासगी वाहनांवर ’पोलीस’ लिहून फिरणार्‍यां विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली होती. ही तक्रार नंतर पोलीस महासंचालक कार्यालया मार्फत 28 जुलै रोजी वाहतूक विभागाकडे पोहोचली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने तात्काळ कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
राज्यभरातील पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना आदेश-अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या निर्देशावरून पोलीस अधीक्षक (मुख्यालय) डॉ. सुनील भारद्वाज यांनी 31 जुलै 2026 रोजी विशेष आदेश जारी केले. या आदेशांच्या प्रती राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्य महामार्ग पोलीस अधिकार्‍यांना पाठवण्यात आल्या आहेत

संबंधित बातम्या

Back to top button