ज्येष्ठ नागरिकांना हेल्मेट वापरणे ऐच्छिक करण्यात यावे

उपेक्षित समाज महासंघाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अमरावती /4 ऑगस्ट: दलित-आदिवासी-बहुजन समाजाच्या न्याय्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी सनदशीर मार्गाने लढा देणार्‍या उपेक्षित समाज महासंघाचे वतीने मा.जिल्हाधिकारी यांना नुकतेच निवेदन देवून ज्येष्ठ नागरिकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे न करता ते ऐच्छिक करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आला. मा. पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयात निवेदन दिले तेव्हा हेल्मेट सक्तीचा कोणताचा जी.आर. नसल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले. महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड, कार्याध्यक्ष श्रीकृष्णदास माहोरे, उपाध्यक्ष इंजि. सुभाष गोहत्रे, महासचिव प्रकाश खंडारे, सचिव इंजि. ज्ञानेश्वर कुर्वे व सुभाष शिंदे आदी पदाधिकारींसह ज्येष्ठ नागरिकांच्या स्वाक्षरीने निवेदनात म्हटले की, अमरावती शहर व जिल्ह्यात हेल्मेट वापरणे सक्तीचे केल्यामूळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार कर्णबधिरतेमूळे कमी ऐकायला येते. डोळ्याने कमी दिसते. अश्यावेळी डोक्यात हेल्मेट घातल्यास अपघात होण्याची शक्यता जास्त असते. वास्तविक पाहता ज्येष्ठ नागरिक हे औषधी, तसेच भाजीपाला व कार्यालयीन कामासाठी घराबाहेर पडतात. ते हलके वाहन वापरतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना हेल्मेट वापरणे सक्तीचे न करता ते ऐच्छिक करण्यात यावे. निवेदन दिल्यानंतर उपस्थित पत्रकांराशी संवाद साधतांना समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी ज्येष्ठ नागरिकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करणे आणि हेल्मेट नसलेल्यांना 1 हजार रुपये दंड करणे हे पोलीस प्रशासनाचे कृत्य अन्यायकारी असल्याचे म्हटले. याप्रसंगी उपेक्षित समाज महासंघाचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

Back to top button