खा.डॉ.अनिल बोंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
दिव्यांग बांधवांना सायकलींचे वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सोहळ्याला मोठी उपस्थिती
अमरावतीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
अमरावती /2 ऑगस्ट- राज्यसभेचे खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावती शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील गरजूंना थेट मदत पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाच्या या विशेष औचित्यावर आयोजित कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना सायकलींचे (मोटरसायकल) वाटप करण्यात आले. तसेच वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (छएएढ) उत्कृष्ट गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. यासोबतच जिल्ह्यात विविध ठिकाणी चष्मा वाटप शिबिर, नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर आणि स्वच्छता मोहीम यांसारखे सामाजिक उपक्रमही यशस्वीपणे राबवण्यात आले. याप्रसंगी बोलताना उपस्थितांनी खा. डॉ. अनिल बोंडे यांनी खासदार पदाच्या काळात अमरावती-पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करण्यासारख्या अनेक महत्त्वाच्या कामांचा आवर्जून उल्लेख केला. अमरावती जिल्ह्यातील वारकर्यांना पंढरपूरच्या प्रवासासाठी या रेल्वेचा मोठा फायदा झाला आहे. सामाजिक बांधीलकी जपत राबवण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमुळे खा. डॉ. अनिल बोंडे यांचा वाढदिवस सोहळा सामाजिक उपक्रमांनी आणि उत्साही वातावरणात पार पडला.
सामाजिक उपक्रमांनी रंगला सोहळा
खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या प्रसंगी दिव्यांग बांधवांना सायकलींचे वाटप करण्यात आले असून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यात चष्मा वाटप, नेत्र तपासणी व स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधीलकी जपण्यात आली. या सोहळ्याला लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.




