सायन्सकोर हत्याप्रकरणी पाच आरोपींना जामीन मंजूर

जिल्हा सत्र न्यायालयातून आरोपींना दिलासा

अ‍ॅडमुर्तुझा आझाद यांचा सफल युक्तिवाद

अमरावती /2ऑगस्ट– शहरातील सायन्स कोर मैदान हत्याप्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली. जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील पाचही आरोपींना जामीन मंजूर केला. आरोपींच्या वतीने अधिवक्ता मुर्तुझा आझाद यांनी केलेला युक्तिवाद प्रभावी ठरल्याचे न्यायालयीन कामकाजातून स्पष्ट झाले. यापूर्वी याच प्रकरणातील एका आरोपीला अटकपूर्व जामीनही मिळाला होता.
अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या दालनात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने सरकारी पक्ष आणि आरोपींच्या बाजूने मांडण्यात आलेला युक्तिवाद शांतपणे ऐकून घेतला. त्यानंतर न्यायालयाने आरोपी अफीज खान युसुफ खान, अहमद खान युसुफ खान, सोनू उर्फ अमीर खान, रहीम खान युसुफ खान आणि विक्की उर्फ एफाज खान या पाचही आरोपींना जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला. या प्रकरणात आरोपींच्या वतीने अधिवक्ता मुर्तुझा आझाद यांनी न्यायालयात सविस्तर बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादाला न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर पाचही आरोपींना दिलासा मिळाला. यापूर्वी याच प्रकरणातील आरोपी अफीज खान युसुफ खान यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. या खटल्यात अधिवक्ता मुर्तुझा आझाद यांच्यासोबत अधिवक्ता नौशीद, अधिवक्ता नदीम, अधिवक्ता आकाश, अधिवक्ता जेनफ, अधिवक्ता काजल आणि अधिवक्ता वासिफ यांनी न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला. तसेच शहाबुद्दीन यांनीही या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य केले.
युक्तिवादाची ठरली निर्णायक बाजू-सायन्स कोर मैदान हत्याप्रकरणातील सुनावणीकडे न्यायालयीन वर्तुळाचे लक्ष लागले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून पाचही आरोपींना जामीन मंजूर केला. आरोपींच्या वतीने अधिवक्ता मुर्तुझा आझाद यांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची ठरली. या कामकाजात अधिवक्ता नौशीद, नदीम, आकाश, जेनफ, काजल, वासिफ यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला, तर शहाबुद्दीन यांनी आवश्यक सहकार्य केले.

संबंधित बातम्या

Back to top button