‘जरा जमके बरसो…’ संगीतमय सुरांची बरसात सोहळा उत्साहात

‘श्रावणात घननिळा बरसला...’ बहारदार गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध , स्व.सोमेश्वर पुसतकर सभागृहात श्रोत्यांची प्रचंड गर्दी

अमरावती/24 जून- पावसाच्या आल्हाददायक हवामाना निमित्ताने आयोजित ’जरा जमके बरसो…’ या संगीत संध्याकाळने 21 जून रोजी संगीतप्रेमींना सुरांची अनोखी भेट दिली. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील दिवंगत सोमेश्वर पुसतकर सभागृह येथे साहस वैदर्भी व मैत्र जीवांचे तर्फे आयोजित या कार्यक्रमाला श्रोत्यांची प्रचंड गर्दी लाभली होती.
या मैफलीत गायक आशुतोष देशपांडे, शीतल भट, केतकी मोह्दरकर-देशपांडे आणि आदित्य खारोकर यांनी पावसावर आधारित लोकप्रिय मराठी व हिंदी गाणी सादर केली. ’ये रात भीगी-भीगी…’, ’रिमझिम गिरे सावन…’ आणि ’श्रावणात घननिळा बरसला…’ अशा गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 70 वर्षांचा संगीत प्रवास उलगडणार्‍या या सोहळ्यात कलाकारांच्या गायकीला वाद्यवृंदाने उत्कृष्ट साथ दिली. सूत्रसंचालक नितीन भट यांच्या प्रभावी संचलनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. अडीच तास चाललेल्या या सोहळ्याची सांगता ’मदर इंडिया’ चित्रपटातील ’दुख भरे दिन बीते रे भैय्या…’ या गीताने झाली. ही संगीत संध्याकाळ अमरावती शहरातील संगीतप्रेमींसाठी अत्यंत संस्मरणीय ठरली.

संबंधित बातम्या

Back to top button