पंचायत समिती अभियंत्यावर धारदार शास्त्राने हल्ला

दर्यापूरच्या कार्यालयामध्ये घरकूल हप्त्यासाठी प्रचंड खळबळ

कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण; सुरक्षा देण्याची मागणी

दर्यापूर/22 जून- पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचा थकीत 5000 रुपयांचा हप्ता न मिळाल्याने संतप्त लाभार्थ्याने दर्यापूर पंचायत समिती कार्यालयातच
अभियंत्यावर धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला केला. या खळबळजनक घटनेमुळे शासकीय वर्तुळात मोठी घबराट पसरली असून कर्मचार्‍यांनी तात्काळ सुरक्षेची मागणी केली आहे. नांदेड बुद्रुक येथील रहिवासी गब्बर नामक व्यक्ती आपल्या हप्त्यासाठी अनेक दिवसांपासून पंचायत समि तीत चकरा मारत होता. आज त्याने घरकूल अभियंता शोएब शेख यांच्याकडे पैशांची जोरदार मागणी केली. मात्र, तांत्रिक कारणांमुळे अभियंत्याने सध्या पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. याचा तीव्र राग येऊन गब्बरने खिशातून धारदार शस्त्र काढून शोएब शेख यांच्यावर थेट वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभियंत्याला सहकार्‍यांनी तातडीने दर्यापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून दर्यापूर पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. शासकीय कर्मचार्‍यांवर वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक प्रशासनाविरोधात कर्मचार्‍यांमध्ये तीव्र संताप आहे.

संबंधित बातम्या

Back to top button