मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

स्वावलंबी नगरातील श्री संत गजानन महाराज

अमरावती /18 जून : अमरावती येथील कठोरा रोड परिसरातील स्वावलंबी नगर अंतर्गत, उर्वशी नगरजवळील ’सखाई पार्क’ येथील श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या मंगलमय कार्यक्रमाचे पौरोहित्य ह.भ.प. पं. राहुलजी महाराज मानकर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत मंत्रोच्चार आणि वेदघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्याकरिता प्रमुख उपस्थिती म्हणून ह.भ.प. श्री. वैष्णवजी महाराज ढोमणे गुरुपीठ :-(श्री दास ज्ञानेश्वर अध्यात्म ज्ञानपीठ, तीर्थक्षेत्र सोनारखेड, ता. भातकुली, जि. अमरावती) तसेच सेवक :-भक्ती सुधा विश्वकल्याण सेवा समिती, अमरावती’ यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण विधी संपन्न झाला. परिसरातील विविध नगरांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीने आणि उत्साहाने या सोहळ्याची शोभा अधिकच वाढली होती.कार्यक्रमाच्या शेवटी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीच्या सर्व सदस्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Back to top button