अकराही मतदारसंघात 90 टक्क्यांच्यावर मतदान

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी

मुंबई /18 जून: राज्यातील 17 विधान परिषदेच्या जागांसाठी आज गुरुवारी (18 जून) मतदान घेण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे, यातील 6 जागांवर आधीच बिनविरोध उमेदवार विजयी झाल्याने आज 11 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. गेल्या महिन्याभरापासून चर्चेत राहिलेल्या या निवडणुकीत कोणी बाजी मारली, याचा निकाल 22 जूनला जाहीर होईल. मात्र, निवडणुकीतील टक्केवारीचा विचार करता या निवडणुकीत 11 जागांवर महायुतीचेच उमेदवार सरशी करण्याची सर्वाधिक शक्यता आहे. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 2 जागांवर 100 टक्के मतदान झाले आहे. तर, उर्वरित 9 जागांवर 90 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. 100 टक्क्यांमध्ये नाशिक आणि भंडारा – गोंदिया या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. आज दुपारी 4 वाजता मतदान संपल्यानंतर सर्व मतपेट्या स्ट्राँग रूमकडे रवाना करण्यात आल्या असून, येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button