भाजप नेत्यासह तिघांची जिवंत जाळून हत्या

छत्तीसगडमध्ये वाळू माफियांचा हैदोस

फॉर्च्युनर कार पेटवली

गाडीतून बाहेर पडणार्‍यांवर धारदार शस्त्राने वार व जबर मारहाण

शिक्षक नागेंद्र सिंह आणि वीरेंद्र सिंह यांचाही मृत्यू

गडचिरोली /18 जून: नक्षलमुक्तीच्या अंतिम टप्प्यावर असलेल्या शेजारील छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात वाळू व्यवसायातील वर्चस्व आणि आर्थिक व्यवहारांतील वादातून भाजपचे स्थानिक नेते भारत सिंह ऊर्फ लाला सिंह यांच्यासह तिघांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा नोगई गावाजवळ घडलेल्या या घटनेत हल्लेखोरांनी भारत सिंह यांच्या फॉर्च्युनर वाहनाचा पाठलाग करून ते ट्रकांच्या सहाय्याने अडविले आणि वाहनाला आग लावल्याचा आरोप आहे. या घटनेने देशात खळबळ उडाली असून वाळू व्यवसायातील वाढत्या गुन्हेगारीचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे.
सोहनत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नोगई गावाजवळ ही घटना घडली. भारत सिंह हे जनपद पंचायतचे माजी अध्यक्ष तसेच भाजपचे स्थानिक नेते होते. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित परिसरातील वाळू उत्खननाचे कंत्राट भारत सिंह यांच्या कुटुंबाकडे होते. दुसरीकडे, वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांचा व्यवसाय त्रिपाठी कुटुंबाकडे असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही गटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक व्यवहार आणि व्यवसायावरील नियंत्रणाच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता.
मंगळवारी रात्री भारत सिंह हे आपल्या सहकार्‍यांसह फॉर्च्युनर वाहनाने प्रवास करत असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर वाहनाच्या पुढे आणि मागे ट्रक उभे करून त्यांचा मार्ग रोखण्यात आला. वाहनाला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग न राहिल्याने हल्लेखोरांनी त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या

Back to top button