अभिजीत दीपकेंना तरुणांनी कानशिलात लगावली
‘कॉकरोच जनता पार्टी’चे जयपूरमध्ये आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
आंदोलकांची हल्लेखोरांना मारहाण
जयपूर/15 जून- जयपूरमध्ये दोन तरुणांनी ’कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या दोन तरुणांना पकडले आणि त्यांना मारहाण केली.
नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणे, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि तरुणांशी संबंधित विविध मुद्द्यांवर आयोजित निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी अभिजीत सोमवारी तिथे पोहोचले होते. अभिजीत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो निदर्शक ’शहीद स्मारक’ येथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. जयपूरमधील हुतात्मा स्मारकाजवळ (मार्टियर्स मेमोरियल) एका आंदोलनात सहभागी झाले असताना, दोन तरुणांनी ’कॉकरो संस्थापक अभिजित दीपके यांच्या कानशिलात लगावली. जयपूरमधील हुतात्मा स्मारकाजवळ (मार्टियर्स मेमोरियल) एका आंदोलनात सहभागी झाले असताना, दोन तरुणांनी ’कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांच्या कानशिलात लगावली. गर्दीच्या दरम्यान, समर्थक अभिजित दीपके यांना खांद्यावर घेऊन जात होते. त्याच वेळी तरुणांनी हल्ला केला.अभिजितच्या समर्थकांनी हल्ला करणार्या तरुणांना पकडले आणि त्यांना मारहाण केली. निदर्शना दरम्यान घोषणाबाजीवरून काही तरुणांमध्ये वाद झाला आणि पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. आंदोलनाच्या ठिकाणी अनेक आंदोलकांचे मोबाईल फोनही चोरीला गेले; त्यानंतर, उपस्थितांनी आपले मोबाईल फोन आणि वैयक्तिक वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन मंचावरून करण्यात आले.




