काळोख हा वेदनादाई असतो, मेरे जीवन का अंतिम उपहार-राष्ट्र के नाम, सर्वांनी सहभाग घ्यावा
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

अमरावती /7 जून : आपल्या देशात असख्य नेत्रहीन बंधु आपले आयुष्य अन्धारातच् घालवित आहेत. त्यांच्या जीवनात काळोख हा वेदनादाई असतो. त्यामुळे त्यांच्या जीवनात उजेडाची वाट आपण फक्त आपल्या नेत्रदाना द्वारेच् निर्माण करू शकतो. म्हणून येत्या 10 जून विश्व नेत्रदान दिनानिमित्त हरिना फॉउंडेशनद्वारे मेरे जीवन का अंतिम उपहार या सामाजिक चळवळीत सहभाग घेऊन सर्व नागरिकांनी स्वयंफूर्ति ने नेत्रदानाचा संकल्प करावा असे भावनिक आवाहन एका वीडियो संदेशाद्वारे अमरावती जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी श्री आशिष येऱेकर यांनी नेत्रदानासाठी डिजिटल द्वारे सहज व सुलभ मार्गाने संकल्प करण्याकरिता हरिना च्या। टठ कोड च्या शुभारंभ प्रसंगी केले. यावेळी त्यांनी नेत्रदानाच्या संपर्कासाठी मोबाइल क्रमांक 9404607890च्या सुरुवातीची घोषणा केली. टठ कोड च्या माध्यमातुन जिल्ह्यातील नागरिक जास्तीत जास्त संखेत नेत्रदानाचा संकल्प घेऊन जगाच्या व देशाच्या पृष्ठभूमिवर जिल्ह्याच्या वेगळा ठसा निर्माण करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. हरिना फाउंडेशनद्वारे विश्व नेत्रदान दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यास सहभाग व सामाजिक भावनेतून नेत्रदान जनजागृति पदयात्रा व नेत्रदान कुटुंबियांप्रति कृतज्ञता आयोजन हे खुप प्रशंसनीय आहे याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
नेत्रदान, अवयव दान, व देहदानाच्या क्षेत्रात पूर्ण महाराष्ट्रात आपल्या अमरावतीची हरिना फाउंडेशन सर्वात सक्रीय व समर्पित आहे या बद्दल जिला अधिकारी या नात्याने मला खुप समाधान आहे हे ही त्यांनी नमूद केले. सर्वाना आपाआपल्या घरी बसून सुलभरित्या नेत्रदानाचा संकल्प डिजिटल माध्यमाने घेता यावा या साठी हरिना द्वारे सदर टठ कोड सेवा उपलब्ध केल्या गेली आहे. सदर टठ कोड द्वारे संकल्प घेतल्यानंतर ताबड़तोब संकल्पकर्त्याचे सर्टिफिकेट सुद्धा डाऊनलोड करता येईल। जिल्हाधिकारी यांना आयोजनाचे निमंत्रण देण्यास व टठ कोड, मोबाइल क्रमांक अनावरणाच्या वेळी हरिनाचे पदाधिकारी व अनेक सदस्य उपस्थित होते.




