बालाजी नगरात वृक्षारोपण व जनजागृती

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज-जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

अमरावती /7 जून : अमरावती महानगरपालिका अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी व अंकुर होलीनेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालाजी नगर, गोखले लेआऊट येथे वृक्षारोपन व जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाला मनपा अमरावतीचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अकीब अहमद, रोग निरीक्षक हैदर अली, नगरसेवक प्रशांतभाऊ महल्ले, नगरसेविका अनिता जितेंद्र काळे, महाराष्ट्र पोलीस दलाचे निलेशभाऊ गाडे तसेच अंकुर होलीनेस फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मान्यवरांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करत नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा स्वयंसेविका संध्या पाटील यांनी केले. यावेळी आरोग्य सेविका सीमा तेलंग, राधिका झाडे, अंजू कासदेकर, बबिता तायडे, अर्चना बारस्कर, मीनाक्षी पाटेकर, फार्मसी ऑफिसर राहुल खलेलकर, आरोग्य सेवक उमेश जाधव, नम्रता मोकळे तसेच शहरी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. बालाजी नगर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक जितेंद्र काळे, गजानन व्यवहारे, देविदास राठोड, प्रमोद गावनेर, कुणाल गावंडे, चंद्रशेखर बेलसरे, मंगेश आठवले, अनिता काळे, कल्पना मदन वानखडे, किरण फटकार, सुनंदा गवई यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एम.पी.डब्ल्यू. बबन खंडारे यांनी केले. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणारा हा उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वी ठरला.

संबंधित बातम्या

Back to top button