मैत्रेय बौद्ध विहाराच्या वास्तूचे उद्घाटन व तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण

अमरावती/5 जून: नजीकच्या मार्डी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रवर्तक बहुउद्देशीय संस्था तथा मैत्रेय युवा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैत्रेय बौद्ध विहाराच्या वास्तूचे उद्घाटन तथा या विहारात तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा विधिवत पार पडला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विश्वशांती आणि मानवकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमाला उद्घाटक खा.बळवंत वानखडे, कार्यक्रम अध्यक्ष माजी मंत्री एड. यशोमती ठाकूर म्हणून उपस्थित होते. पूज्य भंते एस नागसेन, भिकू शिलानंद, भन्ते आनंद, भन्ते बुद्धसेन, आर्या प्रजापती थेरी यांच्या उपस्थितीत मैत्रीय बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. तत्पूर्वी भगवान गौतम बुद्धाची मूर्ती विशेष सजविलेल्या रथात ठेवून गावामधून धम्म रॅली काढण्यात आली. गावातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत ही रॅली मैत्रीय बुद्ध विहारात पोहोचली.धम्म रॅली दरम्यान परिसरात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित बातम्या

Back to top button