पाऊले चालती दिवे घाटाची वाट…

अमरावती/दि,22:आषाढी एकादशीसाठी मानाच्या पालख्यांसह शेकडो दिंड्यांनी पंढरीची वाट धरली आहे. लाडक्या विठुरायाच्या भेटीत वारकरी मजल-दरमजल करत पाऊले टाकत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दोन दिवसांपूर्वी आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर पालखीने आज अवघड असा दिवेघाट पार केला. दिवे घाट पार करताना घाटाने जणू हिरवा शालू नेसल्यासारखं दिसत होतं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाट पार करतानाची विहंगम दृश्य विविध कॅमेर्यात कैद झाली आहे.




