एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा धरणात बुडून मृत्यू

सातनूरच्या पुसली धरणातील घटना : तालुक्यात हळहळ

शेंदुरजनाघाट /18 मे – रखवालीचे काम करणार्‍या संतुलाल उईके यांच्या कुटूंबातील 3 चिमुकल्या मुला-मुलींचा येथुन 5 किलोमीटर सातनूर गावानजीक असलेल्या पुसली धरणामध्ये शेतात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. सातनुर शेत शिवारात संतुलाल उईके हे कुटूंबासह मनोहर निमकर यांच्या शेतातील खोपडीत रखवालदार म्हणुन रहात होते. ते त्यांचे पंकज संतुलाल उईके (10), प्रिया संतुलाल उईके (8), पवन संतुलाल उईके (7) हे मुलं काल 17 मे पासून बेपत्ता होते यांचा शोध त्यांचे वडील व इतर लोक घेत असताना आज 18 मे च्या दुपारी पुसली धरणात त्यांचे मृतदेह आढळून आले. ही तिन्ही मुले नरखेड तालुक्यातील आश्रमशाळेत शिकत असतात ते उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या आई वडिलांकडे सातनूर येथे आले असता ते 17 मे ला सकाळपासून घरी परतले नाही, त्यानंतर संतुलाल उईके यांनी त्यांचा शोध घेतला असता ते आढळून आले नाही. आज 18 मे च्या दुपारी 1 वाजताच्या सुमारास बाजूला असणार्‍या पुसली धरणात यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर घटनेची माहिती शे.घाट पोलिसांना देण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार नुसार हे 2 मुलं 1 मुलगी, सातनूर गावांनजिक असणार्‍या पुसली धरणात आंघोळ करण्यासाठी गेले असावे, असे बोलल्या जात आहे. 17 मे पासून ते घरी परतले नाही, त्यामुळे वडिलांनी त्यांचा शोध घेतला असता आज मात्र त्यांचे कपडे, धरणाच्या बाजुला कपडे आढळुन आले व बाजूला त्यांचा मृतदेह आढळुन आल्यानंतर उईके कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सद्य: परिसरात खळबळं उडाली आहे. या घटनेने मात्र वरुड तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली असुन या घटनेचा पुढील तपास ठाणेदार दीपक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश शेगोकार करीत आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास घटनास्थळाचा पंचनामा करुन तिन्ही मृतदेह वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता रवाना करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास तिन्ही भावंडाचे शवविच्छेदन करुन त्यांच्यावर एकाच वेळी आप्तेष्ट, स्वकीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने मात्र वरुड तालुक्यासह संपुर्ण जिल्हयात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button