पुढील 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांना ‘ब्रेक’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई/14 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानुसार महाराष्ट्र सरकारने मंत्र्यांचा वाहन ताफा निम्म्यावर आणतानाच परदेश दौरेही स्थगित केले आहेत. त्यातच, आता राज्यातील सर्व मोठे शासकीय कार्यक्रम पुढील सहा महिन्यांसाठी स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केला.
देशहितासाठी आपण थोडेही जुळवून घेणार नसू, तर ती विरोधकांच्या प्रगल्भतेची उणीव आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. गुरुवारी विधान परिषदेतील नवनिर्वाचित 10 आमदारांच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चक्क ‘बुलेट’वरून विधान भवनात दाखल झाले. इंधन बचतीचा संदेश प्रतीकात्मक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 2025-26 या साखर विपणन वर्षा (ऑक्टोबर ते सप्टेंबर) साठी अन्न मंत्रालयाने सुरुवातीला 15 लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली होती. त्यानंतर 5,00,000 टनांचा अतिरिक्त कोटा खुला करण्यात आला. त्यापैकी केवळ 87,587 टनांना मंजुरी देण्यात आली. अशाप्रकारे, साखरेच्या सुमारे 16 लाख टन निर्यातीला परवानगी देण्यात आली होती. संपूर्ण 2025-26 या वर्षात 7.5 ते 8 लाख टन साखरेची निर्यात होईल, अशी अपेक्षा अन्न मंत्रालय आणि साखर कारखान्यांना होती. साखर उद्योगातील शिखर संस्था असलेल्या ‘ईस्मा’च्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाढीव उत्पादनामुळे, 2025-26 या हंगामात एप्रिल महिन्यापर्यंत भारताचे साखर उत्पादन 7.32 टक्क्यांनी वाढले. ते 27.52 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. ‘ईस्मा’ने 2025-26 या हंगामातील एकूण साखर उत्पादन (इथेनॉलनिर्मितीसाठी वळवण्यात आलेली साखर वगळता) 29.3 दशलक्ष टन राहील, असा अंदाज वर्तवला आहे. हे उत्पादन 2024-25 मध्ये नोंदवल्या गेलेल्या 26.12 दशलक्ष टनांच्या तुलनेत जास्त आहे.




