अमरावती महावितरण कार्यालयात लाचखोर जेरबंद

सोलर नोंदणीसाठी पंधरा हजारांची मागणी

लाच घेताना दोघे रंगेहात अटकेत

अमरावती/29 एप्रिल- महावितरणच्या अमरावती येथील कार्यालयात सौर ऊर्जा नोंदणीसाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना उपकार्यकारी अभियंता आणि संगणक परिचालक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. सोळा मार्च रोजी दाखल केलेल्या अर्जाच्या प्रक्रियेसाठी ही लाच मागण्यात आली होती.
येथील गर्ल्स हायस्कूल चौक परिसरात असलेल्या महावितरणच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. 37 वर्षीय तक्रारदार सोलर पॅनेल बसवण्याचे काम करतात. 16 मार्च रोजी त्यांनी महावितरणच्या अमरावती कार्यालयात ग्रीन एनर्जी अंतर्गत सोलर नोंदणीसाठी अर्ज केला होता. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. 28 एप्रिल रोजी केलेल्या पडताळणीअंती 15 हजार रुपयांवर तडजोड झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून संगणक परिचालक श्यामकुमार पांडुरंग इझटे याला 15 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणात उपकार्यकारी अभियंता बाळासाहेब दिगंबर खंडारे याचेही नाव समोर आले असून त्याच्यावरही लाच घेतल्याचा आरोप असल्याने त्याला आरोपी करण्यात आले आहे. आरोपींकडून मोबाईल, कागदपत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांच्या घराची झडती सुरू आहे. गाडगे नगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक मंगेश मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली.
लाचखोरी विरुद्ध सतर्कता आवश्यक-सरकारी कामात पारदर्शकता आणण्यासाठी लाचखोरीसारख्या प्रवृत्तींना आळा घालणे गरजेचे आहे. कोणत्याही कामासाठी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असतील, तर नागरिकांनी न डगमगतालाच घेताना दोघे रंगेहात अटकेत

संबंधित बातम्या

Back to top button