बसवेश्वरांचे बसवदालन श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीतर्फे सादर

भारतीय अध्यात्मिक लोकशाहीचे प्रणेते महात्मा

अमरावती/23एप्रिल-अमरावती येथील मृगेंद्र मठात ’बसवा सृष्टी’ प्रदर्शनाचा भव्य सोहळा उत्साहात सुरू झाला आहे. बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक आणि लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा बसवेश्वर यांच्या महान जीवनकार्यावर आधारित 700 दुर्मिळ चित्रांच्या या प्रदर्शनाने अमरावतीकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.श्री आर्ट कला वर्ग आणि कला निर्मिती या संस्थेने अत्यंत परिश्रमातून हे प्रदर्शन साकारले आहे. बाल कीर्तनकार सार्थक गायकवाड यांच्या हस्ते प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन झाले. यावेळी त्यांना बसवेश्वरांचे चित्र भेट देऊन सन्मानित करण्यात आले. बसवेश्वरांनी बाराव्या शतकात लिंगायत पंथाची स्थापना करून समता स्वातंत्र्य आणि बंधुभावाचा जो संदेश दिला, तोच विचार या चित्रकृतींतून प्रत्यक्ष अनुभवता येतो. या सोहळ्याला भारताचे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि शिव संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांनी आवर्जून भेट दिली. त्यांनी कलाकारांच्या कष्टाचे भरभरून कौतुक केले. प्रा. सारंग नागठाणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी विलास इंगोले, आ. प्रताप अडसड, आ. संजय खोडके, आ. सुलभा खोडके, सुरेश रतावा, नगरसेवक प्रा. संजय तीर्थकर, सुनीतताई भोबे, संजय गव्हणकर, विजय ओडो, पराग जनवाळकर, सदानंद कुंडे, किशोर कुंडेकर, बाळसाहेब मिगे, प्रवीण मकोटे, राजा हारे, मनोज भोबे, नगरसेवक प्रा. संजय शिरभाते, कैलास गिलोरकर, विलास काळे, रमेश अप्पा जुणकर, अजय मेडसे, रमेश अप्पा मेडसे, अक्षय पवार, धनंजय चव्हाण, अनिल खपटे, प्रवीण रोकडे, प्रमोद मिटकरी, सुरेश टकल, अजय जी कल्याणकर, अशोक सपटे, डॉ. हटवार, कडवार, गजानन लमघडे, दीपक बाजारे, सुनील अभिर, प्रकाश कोरे, प्रा. रविकांत कोल्हे, अविनाश डेमापुरे, शिरीष मिगे, संजय बलोरे यांच्यासह वीरशैव महिला मंडळी आणि श्री आर्ट कला वर्गाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button