सोलापूरचा विजय लामकाने, आरती जाधव राज्यात प्रथम

राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई/8 एप्रिल– महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला आहे. 27 ते 29 मे, 2025 या कालावधीत घेतलेल्या परीक्षेचा निकाल 8 एप्रिल, 2026 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला. या निकालात सोलापूर जिल्ह्याने वर्चस्व मिळवले असून, सोलापूरचे विजय नागनाथ लामके सर्वसाधारण आणि मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत. तर, महिलांमध्ये सोलापूर जिल्ह्याची आरती परमेश्वर जाधव राज्यात पहिल्या क्रमांकावर आल्या आहेत. राज्य सेवा मुख्य परीक्षेत विविध 20 संवर्गातील 461 पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाने अंतिम निकालात प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुणही जाहीर केले आहेत. शिफारसपात्र उमेदवारांची पात्रता त्यांच्या मूळ प्रमाणपत्रांवरून तपासल्या जाणार आहे. जर उमेदवारांनी आवेदनपत्रात चुकीची माहिती दिली असेल किंवा आवश्यक प्रमाणपत्रेन दिल्यास किंवा इतर कारणास्तव अपात्र ठरले, तर त्यांची उमेदवारीकोणत्याही टप्यावर रद्द केली जाऊ शकते. वैद्यकीय तपासणीस अनुपस्थितराहिलेल्या उमेदवारांचा अंतिम निकालात समावेश केलेला नाही. तसेच,निकाल समांतर आरक्षण आणिन्यायालयीनप्रकरणांतील अंतिमआदेशाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. उच्च न्यायालय,मुंबई येथे दाखल रिट याचिक क्र.1746/2026  प्रकरणातील आदेशानुसार काही उमेदवारांचा निकालात समावेश करण्यात आला आहे,परंतु प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या शिफारशी राखून ठेवण्यात आल्याआहेत. दिव्यांग, अनाथ, खेळाडू, मागास व इतर आरक्षित प्रवर्गातीलउमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाच्या तपासणीनंतर अंतिम करण्यातयेईल.

Back to top button