रस्त्यात ट्रक अडवून 250 क्विंटल तूर लुटली

शस्त्राचा धाक दाखवून टोळीची मोठी लूट

दर्यापूर, मुर्तिजापूर आणि कारंजा बाजार समितीत मुद्देमालाची विल्हेवाट

यवतमाळच्या लोहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

दर्यापूर/2मार्च: यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाणे अंतर्गत येणार्‍या औद्योगिक वसाहत परिसरातून एका टोळीने ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून 250 क्विंटल तूर आणि ट्रकसह पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाचे जाळे विणले असता, हा चोरीचा माल दर्यापूर, मुर्तीजापूर आणि कारंजा येथील बाजार समित्यांमध्ये सर्रासपणे विकला गेल्याचे समोर आले आहे. या खळबळजनक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात आणि व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून अंदाजे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल या गुन्ह्यात गुंतलेला आहे.
या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, मालवाहू ट्रक तूर भरून जात असताना वाटेत दबा धरून बसलेल्या लुटारूंनी शस्त्राचा धाक दाखवून चालकाला धमकावले आणि ट्रकचा ताबा घेतला. लोहारा पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच तातडीने शोधमोहीम राबवून दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता, त्यांनी चोरीची ही तूर वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये व्यापार्‍यांना विकल्याची धक्कादायक कबुली दिली. विशेषतः दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ’टोळे ट्रेडर्स’ यांच्याकडे मालाची विक्री झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गुरुवारी दुपारी जेव्हा लोहारा पोलिसांचे पथकतपासासाठी दर्यापूर बाजार समितीत धडकले, तेव्हा तिथे उपस्थितअसलेल्या अडत्यांची आणि शेतकर्‍यांची मोठी धांदल उडाली. चोरीचा मालअधिकृत बाजार समित्यांमध्ये इतक्या सहजपणे कसा विकला गेला, असाप्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलिसांनी बाजार समितीमधील व्यवहारांच्यानोंदी आणि पावत्यांची तपासणी सुरू केली आहे. दरम्यान, बाजार समितीच्यासभापतींनी या प्रकरणावर कानावर हात ठेवले असून, त्यांना अशा कोणत्याहीव्यवहाराची माहिती नसल्याचे अजब उत्तर दिले आहे. या प्रकरणातीलधागेदोरे मोठे असण्याची शक्यता असून, तपासात अडथळा येऊ नये म्हणूनपोलिसांनी आरोपींची नावे सध्या जाहीर केलेली नाहीत.

Back to top button