भक्तीचा महापूर : राणा दांपत्याचे चालीसा पठण

हनुमान गढीवर अलोट जनसागर

संकटमुक्तीसाठी बजरंगबलीला साकडे आणि महाआरती

अमरावती/2 एप्रिल– अमरावतीच्या पावन मातीत काल हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रद्धेचा एक अथांग सोहळा पार पडला. हनुमान गढीच्या पवित्र परिसरात आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत हजारो भाविकांनी एकस्वरात 21 वेळा हनुमान चालीसाचे पठण केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि ’जय श्रीराम’च्या गर्जनेत अवघा परिसर न्हाऊन निघाला होता. राज्यावरील सर्व संकटे टळावीत आणि बळीराजाच्या घरात सुख-समृद्धी नांदो, हीच आर्त साद यावेळी या दांपत्याने मारुतीरायाला घातली.
हनुमान गढीवर साकारत असलेल्या 151 फूट उंच भव्य मूर्तीच्या चरणी नतमस्तक होत, राणा दांपत्याने जनसेवेचा वसा अधिक दृढ केला. होम-हवन, भजन आणि कीर्तनाच्या सुरावलींनी भक्तीचा हा मळा अधिकच फुलला होता. यावेळी ह.भ.प. सागर महाराज देशमुख, संत राजेशजी मोरडिया, नितीन धांडे, सचिन भेंडे, नाना आमले, प्रा. प्रशांत वानखडे, संजय हिंगासपुरे, सुमती ढोके, अजय जयस्वाल, किशोर जाधव, दीपक साहू, डॉ. प्रीती रेवणे, नंदा सावदे, रजनी डोंगरे, गौरी मेघवानी, महेश मूलचंदानी, योगेश विजयकर, अर्चना पांडे, प्रियांका पाटणे, मीराताई कांबळे, मधुरा कहाळे, सुनील खराटे, संजय नरवणे, राधा कुरील, मंगेश मनोहरे, सुनील काळे, सोनाली नवले, ज्योती सैरीसे, वीरेंद्र उपाध्याय, मिथिलेश तिवारी, सत्येंद्रसिंग लोटे, घनश्याम डकरे, प्रशांत कावरे, उदय पर्वतकराव, राजू कुरील, अविनाश काळे, देवा शेंडे, विजय दुधे, अविनाश तापडिया, सुरेश ठक्कर, ज्योती यावलकर, माधुरी बाकडे, प्रेमा लव्हाळे, वंदना जामनेकर, करण डेढवाल, विजय मलीक, मंगेश कोकाटे, राजेश तरडेजा, मुकेश गिरी, सिमा धवस, अश्विनी ढोके, जीवन सरदार, खुशाल गोंडाणे, संदीप कांबळे, राहुल बजाज, किशोर पिंवाल, निखिल वावगे, ऋषिकेश जाधव, जितू मोटवानी, राऊत भाऊ, शुभम उंबरकर, अजय बोबडे, राहुल काळे, सोपान बोरकर, सुधीर लवणकर आणि कमलेश कारिया यांसह सर्व पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button