रक्तदानाने शहिदांना वाहिली आगळीवेगळी श्रध्दांजली

मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात 230 रक्तबाटल्यांचे संकलन

अमरावती /27 मार्च : देशासाठी प्राणांची आहुती देणार्‍या शहिदांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, स्थानिक प्रा. राम मेघे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदानातून अनोखी मानवंदना वाहिली. शहीद दिनाचे औचित्य साधून आयोजित या भव्य शिबिरात 230 रक्तबाटल्यांचे संकलन करण्यात आले असून, ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असल्याचा संदेश ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाची सुरुवात शहिदांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष डॉ. उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, कार्यकारी सदस्य नितीन हिवसे, डॉ. पूनमताई चौधरी, पंकज देशमुख, प्रा. विनय गोहाड आणि प्रा. गजानन काळे यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ. अजय ठाकरे यांच्या नेतृत्वात हे शिबिर संपन्न झाले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि रेड रिबन क्लबने या कार्यासाठी पुढाकार घेतला होता. यामध्ये प्रा. डॉ. संजय कुलकर्णी, प्रा. डॉ. महेंद्र भुतडा, अजय दातेराव, प्रमोद मिसाळ, डॉ. सुरभी सोनी, डॉ. ऋतुजा कराळे, डॉ. वैशाली चौधरी, डॉ. अजय साखरे, डॉ. अविनाश उकंडे, डॉ. प्रफुल्ल पेदाम, मिलिंद तायडे आणि योगेश पानझडे यांनी अत्यंत तत्परतेने सेवा दिली. तसेच विभागाचे प्रमुख डॉ. दिनेश हरकुट, डॉ. प्रीती खोडके, डॉ. काश्मिरा काष्ट, डॉ. अमित मोहोड, डॉ. लव्हलीसिंग मुतनेजा, डॉ. किरण डोंगरे, डॉ. महेश जानोरकर व डॉ. लोभस गढेकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. शुभम कदम, प्रा. अपर्णा खैरकार, डॉ. किशोर ढाके, प्रा. विजय खंडारे, प्रा. अतुल डहाणे, प्रा. अमोल नेरकर, अंकुर मोहोड यांच्यासह अनुप भगत, जयवंत तीरमारे, अनुराग जगनाडे, कार्तिक कदम, प्रणव मुळे, अल्हाद रामटेके, शंतनू कदम, वेदांत पोहरे, देवयानी कळंबे, वैष्णवी चौधरी, देवयानी बावनकर, सिद्धी वाघळे, सांची घरडे, पूर्वश्री विखे, चिन्मयी घोटीकर आणि सलोनी भट्ट या तरुण स्वयंसेवकांनी रक्तदानासाठी गाव-खेड्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत हे शिबिर यशस्वी केले.

संबंधित बातम्या

Back to top button