अमरावती महानगरपालिकेत शहीद दिनानिमित्त अभिवादन

अमरावती /23 मार्च : शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना अभिवादन करताना अमरावती महानगरपालिकेत अमर शहीद हेमू कलानी यांची जयंतीही उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दि. 23 मार्च,2026 रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले. यावेळी महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमास सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, नगरसेवक मनिष बजाज, नगरसेविका सौ. गौरी मेघवानी, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे,उपायुक्त योगेश पिठे, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, कार्यालय अधिक्षक गुलशन मिरानी, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, शिवा फुटाणे तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्जेराव गलपट हे भगतसिंग यांच्या वेशभूषेत उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button