ठाकरे परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम

आई-वडिलांच्या अभिष्टचिंतनातून संस्कारांचा जागर

अमरावती /4 मार्च : तालुका चांदूरबाजार अंतर्गत बेलोरा येथील ठाकरे परिवाराने आई प्रमोदिनी ठाकरे व बाबा श्री दिगांबरराव ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे सामाजिक पद्धतीने उत्साहात आयोजन केले. कुटुंबप्रमुखांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या आयुष्यभराच्या त्याग, प्रेम आणि संस्कारांचे स्मरण या सोहळ्यात करण्यात आले. घरगुती कार्यक्रमाला सामाजिक स्वरूप देत, ज्येष्ठांचा सन्मान हाच खरा संस्कार हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा सुंदर प्रयत्न यावेळी पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्क्रांती शिक्षण संस्था, जरूडचे अध्यक्ष श्री. रामरावजी वानखडे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ. सुलभाताई खोडके, आमदार श्री. संजयराव खोडके, माजी राज्यमंत्री श्री. बच्चुभाऊ कडू, डॉ. सौ. नयनाताई कडू, नगरसेवक चंदूभाऊ खेडकर, नगरसेवक गुड्डुभाऊ धर्माळे तसेच ह.भ.प. रमेश महाराज अवारे, ह.भ.प. रामेश्वर महाराज इंगळे आणि प्रा. राजू शिंदे सर यांची मान्यवर उपस्थिती लाभली. उपस्थितांनी ठाकरे दांपत्याच्या साधेपणा, समाजाभिमुख वृत्ती आणि कुटुंबातील ऐक्यभावाचे कौतुक करत त्यांच्या दीर्घायुष्याकरिता शुभाशीर्वाद दिले. वातावरण अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण होते. या सोहळ्यास ठाकरे परिवारातील सौ. प्रतिमा व श्री. विस्मय ठाकरे, सौ. श्रुतिका व श्री. भैय्यासाहेब ठाकरे, सौ. अश्विनी व श्री. योगेश ठाकरे, माधुर्य, कात्यायनी, स्वानंदी, सर्वज्ञ, ज्ञानवी, अनवी तसेच समस्त ठाकरे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने कुटुंबातील एकोप्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे सुंदर दर्शन घडले. ज्येष्ठांचा सन्मान आणि समाजाशी नाते जपण्याचा आदर्श ठेवणारा हा अभिष्टचिंतन सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Back to top button