उद्या राष्ट्रपती शेगावात श्री चरणी
मंगळवार आणि बुधवारी दर्शनाच्या वेळेत बदल

शेगाव /23 फेब्रुवारी : बुलढाणा जिल्ह्याचे भूषण आणि विदर्भाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदयांचे आगमन होत आहे. येत्या 25 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपती महोदया श्रींचे दर्शन घेणार असून, त्यांच्या या दौर्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि प्रशासकीय कारणास्तव दोन दिवस दर्शनाच्या वेळेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी संस्थान आणि जिल्हा प्रशासनाने हा विशेष निर्णय घेतला असून, राष्ट्रपतींच्या दौर्यामुळे मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. श्री गजानन महाराज संस्था नच्या वतीने मिळालेल्या अधि कृत माहिती नुसार, महामहीम राष्ट्रपती महो दयांच्या दौर्या साठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. बुलढाणा जिल्हा धिकारी यांच्या मार्गदर्शना खाली या दौर्यासाठी सर्वोच्च राजशिष्टाचार आणि सुरक्षा नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. या नियोजनाचा एक भाग म्हणून मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 रोजी प्रशासनाच्या वतीने सुरक्षा सराव (रंगीत तालीम) आयोजित करण्यात आला आहे. या तालीमीमुळे मंगळवारी सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत श्रींचे दर्शन सर्व भाविकांसाठी स्थगित ठेवण्यात येणार आहे. मुख्य दौरा बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून, राष्ट्रपतींच्या प्रत्यक्ष दर्शनाच्या वेळी सुरक्षेचे नियम अधिक कडक राहतील. बुधवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत श्रींचे दर्शन सामान्य भक्तांसाठी बंद राहील. राष्ट्रपतींचा दर्शन सोहळा आटोपल्यानंतर दुपारी 12.30 वाजेनंतर मंदिर सर्व भाविकांसाठी पुन्हा नेहमीप्रमाणे खुले करण्यात येईल. या काळात मंदिर परिसरात भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि नियोजित वेळेनुसारच दर्शनासाठी गर्दी करावी, असे आवाहन श्री गजानन महाराज संस्थान आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रपतींच्या दौर्यामुळे मंदिरात दर्शनासाठी खालील प्रमाणे बदल असतील:
मंगळवार 24 फेब्रुवारी: सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 पर्यंत दर्शन बंद (तालीम वेळ).
बुधवार 25 फेब्रुवारी: सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 पर्यंत दर्शन बंद (दौरा वेळ).
सहकार्याचे आवाहन: दर्शनासाठी येणार्या भाविकांनी या बदलाची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.




