शिक्षकांचा वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

देऊळगाव राजा/16 नोव्हेंबर :- छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव राजा येथे 13 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यावतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट यांच्यामार्फत आयोजित केले गेले आहे सदर प्रशिक्षण हे महाराष्ट्रभर पार पडत आहे. वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त करण्यासाठी हे सेवांतर्गत प्रशिक्षण अनिवार्य आहे भविष्यकाळाचा वेद आणि वर्तमानातील बदल अंगीकारण्यासाठी दिशा आणि मार्गदर्शन करण्याचे काम या प्रशिक्षणातून साधले जाणार आहे सेवेत रुजू होतानाची परिस्थिती आणि त्यानंतर असलेली स्थिती यासाठी स्वतःला सिद्ध करणे आवश्यक असते प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा,शिक्षण प्रक्रियेत नव्याने होत असणारे बदल, धैर्य, थोरणे,कायदे बदलते अध्यापन विषयीचे दृष्टिकोन, शिक्षण व्यवस्था यांना समजून घेणे आणि तसे बदल आपल्यात आत्मसात करणे आवश्यक असते या प्रशिक्षणासाठी श्रीकृष्ण सपकाळ गटशिक्षणाधिकारी, देऊळगाव राजा, स्वप्नील निकम गटशिक्षणाधिकारी सिंदखेड राजा, डॉ. श्रीहरी दराडे अधिव्याख्याता जि. शि. प्र. संस्था बुलढाणा दादाराव मुसदवाले शिक्षण विस्तार अधिकारी दे. राजा,रंगनाथ गावडे शिक्षण सुरेश शिंगणे, विशाल कंकाळ,सोनुने, पंढरीनाथ बुरकूलहे परिश्रम घेत आहे.

Back to top button