एआयसीटीई इंटर्नशिपमध्ये पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा देशात दुसरा क्रमांक

एडुस्किल्स व्हर्च्युअल इंटर्नशिप 14 व्या कोहोर्टच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात महाविद्यालयाचा गौरव

अमरावती /12 फेब्रुवारी : मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, नॅशनल इंटर्नशिप पोर्टल आणि एडुस्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या एआयसीटीई-एडुस्किल्स व्हर्च्युअल इंटर्नशिपच्या 14 व्या कोहार्ट (ऑक्टोबर 2025 ते डिसेंबर 2025) दरम्यान घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी , सादरीकरण तसेच मूल्यमापन व प्रमाणपत्रच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात पी.आर. पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय अमरावती यांनी भारतातील टॉप 10 परफॉर्मिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीला व विद्यार्थ्यांच्या कौशल्याधारित शिक्षणाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. या अभियांत्रिकी प्रभागामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय एकमेव आहे. या यशामुळे अमरावती जिल्ह्याचे शैक्षणिक क्षेत्रात नाव उज्ज्वल झाले असून संस्थेच्या गुणवत्तेची आणखी एक राष्ट्रीय पातळीवर नोंद झाली आहे. एआय सीटीई-एडुस्किल्स व्हर्च्युअल इंटर्नशिप उपक्रमांतर्गत विद्या र्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलि जन्स, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन, रोबोटिक्स अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यात आले. या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सहभागाची संख्या, प्रोजेक्ट पूर्णत्वाचे प्रमाण, उद्योगतज्ज्ञांकडून मिळालेला अभिप्राय, नवोपक्रमशील प्रकल्प सादरीकरणे व एकूण कामगिरी या निकषांवर देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले. या सर्व निकषांमध्ये पी.आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रातून प्रथम व भारतामधून द्वितीय स्थान पटकावले. संस्थेतील विद्यार्थ्यांनी केवळ मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला नाही, तर गुणवत्तापूर्ण प्रकल्प सादर करून आपली कौशल्ये सिद्ध केली. अनेक विद्यार्थ्यांनी उद्योगमान्य प्रमाणपत्रे प्राप्त केली असून काही विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांकडून इंटर्नशिप व प्लेसमेंटच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. संस्थेचे प्राचार्य डॉ पी. एम. जावंधिया यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता उद्योगसुसंगत कौशल्ये विकसित करणे हे आमचे ध्येय आहे. एआयसीटीई-एडुस्किल्स व्हर्च्युअल इंटर्नशिपमधील हे राष्ट्रीय स्तरावरील यश म्हणजे आमच्या शिक्षकवर्ग, इंटर्नशिप विभाग तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. महाविद्यालयातील इंटर्नशिप विभाग तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना योग्य वेळी नोंदणी, प्रशिक्षण, प्रकल्प पूर्णत्व व मूल्यमापन प्रक्रियेत मदत मिळाली. तसेच विभागप्रमुख व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. संस्थेतील रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलनेही विद्यार्थ्यांना नवोन्मेषी प्रकल्प विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

संबंधित बातम्या

Back to top button