भीषण अपघात; नेमबाज संभाजी पाटील यांचा मृत्यू

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गा वर कारच्या भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेम बाज संभाजी पाटील यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कार चालक जखमी झाला आहे. कार चालकाच्या विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस येथील हेरिटेज डेअरी समोर आज सकाळी दहाच्या सुमारास गुजरातच्या दिशेनं जाणार्‍या भरधाव फॉर्च्युनर कारनं पुढे असलेल्या अवजड वाहनाला जोरदार धडक दिली. कारच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातात कारच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. कारनं अवजड वाहनाला दिलेली धडक इतकी भीषण होती की चालकाच्या शेजारी बसलेल्या संभाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कार चालक यश चौधरी किरकोळ जखमी झाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button