जनतेच्या सुखासाठी आ.रवि राणा गजानन माऊलींच्या चरणी

अमरावती जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून साकडे

* प्रकट दिनानिमित्त विविध मंदिरांत भक्तीचा मोठा उत्साह

अमरावती / 8 फेब्रुवारी : संत श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या पवित्र पर्वावर अमरावतीचे आमदार रवि राणा यांनी शहर आणि ग्रामीण भागातील विविध मंदिरांमध्ये जाऊन श्रींचे दर्शन घेतले. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि सामान्य जनतेच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. माऊलींच्या विचारातून समाजात एकोपा आणि सेवाभाव वृद्धिंगत व्हावा, हाच या भेटीचा मुख्य उद्देश होता.
आ. रवि राणा यांनी सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात विविध मंदिरांना भेटी देऊन आरती व पूजेत सहभाग नोंदवला. त्यांनी विशेषतः शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, तसेच जिल्ह्यात शांतता व सद्भावना कायम राहावी, यासाठी माऊलींकडे आशीर्वाद मागितले. या दौर्‍यात क्रांती कॉलनी, न्यु प्रभात कॉलनी, रवि नगर, छांगाणी नगर, स्वस्तीक नगर, साई नगर, माळीपुरा जुनिवस्ती बडनेरा, लढ्ढा प्लॉट, शिक्षक कॉलनी नवीवस्ती बडनेरा, विवेकानंद कॉलनी, प्रिया नगर, कमल कॉलनी, सामरा नगर, बापू कॉलनी, केडीया नगर, छाया कॉलनी, महावीर नगर, शिवशक्ती नगर, आचल विहार, भाजीबाजार, प्रवीण नगर, महेंद्र कॉलनी, राठी नगर आणि शेगाव नाका अशा अनेक परिसरातील मंदिरांचा समावेश होता. प्रत्येक ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती. आमदार राणा यांच्या या आध्यात्मिक दौर्‍यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, माऊलींच्या कृपेने जिल्हा प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

सेवेचा आणि भक्तीचा संकल्प

प्रकट दिनानिमित्त आमदार रवि राणा यांनी केवळ दर्शनच घेतले नाही, तर जनसेवेचा संकल्पही केला. सामान्यांचे प्रश्न सुटणे हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. भक्तांच्या अलोट उत्साहाने आणि माऊलींच्या जयघोषाने संपूर्ण अमरावती नगरी दुमदुमून गेली होती.

संबंधित बातम्या

Back to top button