शहरातील गजबजलेल्या इर्विन चौकात ‘द बर्निग कार’चा थरार

उड्डाणपुलाजवळच धावत्या कारने घेतला अचानक पेट

सुदैवाने कोणतीच प्राणहानी झाली नाही

अमरावती/ 6 फेब्रुवारी शहरातील गजबजलेल्या इर्वीन चौकातून राजापेठकडे जाणार्‍या उड्डाणपुलाकडे जाणारे एक धावत्या चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला आणि काही वेळातच ही गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान घडलेल्या घटनेमुळे गजबजलेल्या रस्त्यावर एकच गोंधळ उडाला होता. सुदैवाने कामरगाव येथील रहीवासी असलेल्या गाडी मालक डॉ. भाऊ साहेब लहाने यांनी समयसुचकता दाखवून ते गाडी बाहेर पडल्या मुळे ते बचावले. इर्वीन चौक परीस रातील रस्ते नेहमी वाहनाच्या वर्दळीने गजबजलेले असतात. अश्यातच कामरगाव येथील डॅा. भाऊसाहेब लहाने यांनी आपल्या गाडीच्या अलायमेन्टचे काम करुन ते इर्वीन चौकातून उड्डाणपुलामार्गे जात असतांना गाडीने उड्डान पुलावर प्रवेश करताच गाडीने अचानक पेट घेतला. रात्री ची वेळ असतांना या पेटलेल्या गाडीमुळे रस्त्यावरील नागरीकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने प्रसंगावधान राखून डॉ. भाऊसाहेब लहाने गाडीच्या बाहेर पडल्यामूळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी जलद गतीने घटनास्थळी दाखल झाले व पेटती गाडी विझविली. मात्र भररस्त्यावरील पेटलेल्या द बर्निंग कारचा थरार नागरीकांनी अनुभवला.

संबंधित बातम्या

Back to top button