विदर्भ स्नेहवर्धन मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मान्यवरांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार

* कार्यक्रमात महिला व बालकांचा उस्फूर्त सहभाग

अमरावती /3 फेब्रुवारी : मैदानी खेळ, विविध गीतांची मैफिल, नृत्य, नाटक ,उखाणे इत्यादी विविध कार्यक्रमात बालकलाकार व महिला सभासदांनी सहभागी होऊन विदर्भ स्नेहवर्धन मंडळाचे 30 वे वार्षिक स्नेहसंमेलन नाशिक येथील त्रयेबेकेश्वर मार्गावरील रमेश दहेकर यांची निशा फार्म हाऊस येथे उत्साहात साजरे करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश बोराडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून रमेश दहेकर, माजी उपप्राचार्य शेषराव बूले, किशोर करुले,सुरेंद्र गिरी उपस्थित होते. प्रारंभी जे सभासद किंवा त्यांचे नातेवाईक दिवंगत झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमात दहावी, बारावी, पदवीधर परिक्षेत प्रथम येणारे तथा विविध क्षेत्रात नेत्र दीपक कामगिरी करणारे हदिशा गुल्हाने, स्वीटी कालकर, कु.भागवत, खुशाली पाचघरे, गौरव गुलाहे,कांचन निंभोलकर, निकेश रानोटकर, सक्षम मोहे,इशिका मोहे या सर्वांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तेज ग्यान फाउंडेशन पुणेच्या नाशिक जिल्हा झोन संयोजक म्हणून निवड झाल्याबद्दल रवींद्र गिरी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय वाघुळे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी जुन्या कार्यकारिणीला निरोप देऊन नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष सुरेश बोराडे, उपाध्यक्ष मंजुषा प्रवीण गुल्हाने , सचिव संजय बाजड, कोषाध्यक्ष किशोर करुले, सह कोषाध्यक्ष भोजराज सातपुते,लेखापरीक्षक सुरेंद्र गिरी, सल्लागार समितीमध्ये डॉ. एस. आर. भोंडे, नंदकुमार भागवत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेषराव बूले यांनी केले तर आभार किशोर करुले यांनी मानले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

संबंधित बातम्या

Back to top button