विद्यार्थ्यांची आंतरविद्यापीठ ‘अविष्कार’ स्पर्धेसाठी निवड

वसुधाताई देशमुख अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या

अमरावती /2 फेब्रुवारी : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धेत सौ. वसुधाताई देशमुख अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय पाळा च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उज्वल परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे 11 व 12 डिसेंबर 2025 रोजी आंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यापीठातील 16 महाविद्यालयांतील 64 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यात वसुधाताई देशमुख अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांनी आपले संशोधन सादर केले. या स्पर्धेत आदित्य प्रवीण साबळे या विद्यार्थ्याने पियोर सायन्स या विभागात प्रिपरेशन ऑफ वाटरलेमन सीड्स बटर या विषयावर शोध प्रबंध सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच निखिल संजय कोल्हे याने पियोर सायन्स विभागात इम्म्युनिसीप : हर्बल कंटोला ज्यूस या विषयावर शोध प्रबंध सादर करून विद्यापीठ संघात आपले स्थान निश्चित केले. युगांती मधुकर बुरणासे हिने इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि विभागात एडिबल पॅकिंग विथ स्पिरुलिना या विषयावर संशोधन सादर करून विद्यापीठ संघात निवड मिळवली. कार्तिक देविदास डाबरे याने मेडिसिन अँड फार्मसी विभागात प्रिपरेशन ऑफ मलबार स्पिनॅच हर्बल कॅप्सूल या विषयावर शोध प्रबंध सादर करून विद्यापीठ संघात स्थान मिळवले. तसेच कुमारी गौरवी संजय निर्मळ हिने ऍग्रीकल्चर अँड ऍनिमल हसबेंडरी विभागात टफ ग्रेन अँड इट्स व्हाल्यू अड्डेड प्रॉडक्ट्स या विषयावर संशोधन सादर करून विद्यापीठ संघात निवड मिळवली.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय श्रमसाफल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा माजीमंत्री मा. वसुधाताई देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. डी. खेडकर, निवड समिती सदस्य डॉ. रूपाली देशमुख, डॉ. योगिता सव्वालाखे, डॉ. गौरी देशमुख, डॉ. वैशाली देशमुख, तसेच प्रा. राहुल पावशे, प्रा. हितेश गावंडे, प्रा. सारंग ताजने, डॉ. सोनाली भगत व प्रा. सुप्रिया कांबळे यांच्या मार्गदर्शनाला दिले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button