गिरीश महाजनांनी जाहीर माफी मागावी

नाशिक : राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी नाशिक जिल्हा धिकारी कार्यालायात ध्वजवंदन केले. येथील कार्यक्रमात भाषण करताना त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नाही. त्यावरुन, चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत असून वन विभागाच्या दोन महिला पोलीस कर्मचार्यांनी गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली असून अनावधानाने माझ्याकडून नाव घेण्याचं राहिलं. तसेच, मी बाबासाहेबांच्या प्रत्येक जयंती स्वत:हून सहभागी असतो, नाव न घेण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता, असेही सांगितले. मात्र, महाजन यांनी केवळ दिलगिरी व्यक्त न करता, जाहीर लेखी माफी मागावी, अशी मागणी आता माधवी जाधव यांनी केली आहे.




