हळदी कुंकू कार्यक्रमातून एकजूट व सक्षमीकरणाचा संदेश
शिक्षक महासंघाचे आयोजन ; शेकडो महिलांची लक्षणीय उपस्थिती

अमरावती /27 जानेवारी : शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सह-संयोजक चंद्रशेखर भोयर यांच्या संकल्पनेतून शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य हळदी-कुंकू कार्यक्रम अमरावतीत अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला तब्बल 550 महिला शिक्षकांची उपस्थिती लाभली. त्यामुळे हा कार्यक्रम महिला एकजूट, सन्मान व सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देणारा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा.नवनीतताई रवी राणा होत्या. प्रमुख पाहुण्यांमध्ये नीलिमा टाके, प्रिया देशमुख , शुभांगी ताई क्षितिजराव अभ्यंकर, सौ. छायाताई दंडाळे (माजी संचालिका, महाराष्ट्र राज्य कापूस पणन संघ), आरती ताई राजेश वानखडे व सोनाली भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चंद्रशेखर भोयर यांनी महिला शक्तीचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. महिला केवळ घर सांभाळणार्या नसून त्या समाज घडवणार्या असतात. महिलांना नेतृत्वाची संधी, सन्मान व योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी शिक्षक महासंघ सातत्याने प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात माजी खासदार नवनीतताई राणा यांनी भोयर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, कोणतेही संविधानिक पद नसतानाही श्री. भोयर शिक्षक बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहेत. त्यांना योग्य संधी मिळाल्यास शिक्षण क्षेत्रात मोठी परिवर्तनकारी चळवळ उभी राहील, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.या यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोमलताई दंडाळे, अर्चना कराळे, तृप्ती देशमुख, वैशाली रघुवंशी, सुषमा सोनारे, रोशनी राठी, लिना नवले, पुनम चौधरी, सौ. प्रतिभा ठाकरे, संपदा देशमुख, रजनी माहोरे, शोभा खंडारे, डॉ. मेघाराणी सोळंके, आशा ढोके, संतोष राठी, वर्षा पंजाबी व सौ. स्वाती राठी यांनी परिश्रम घेतले.




