
अमरावती : प्रभाग क्रमांक -1 शेगाव – रहाटगाव प्रभागातील ब ( नागरिकांचा मागास प्रवर्ग ) मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार चंद्रकांत उर्फ चंदुभाऊ एकनाथराव खेडकर यांनी विजय प्राप्त होताक्षणी आ.सुलभाताई संजय खोडके यांच्या निवास स्थानी भेट देत आ.सुलभाताई खोडकेंच्या वतीने देण्यात आलेल्या शुभेच्छा व अभिनंदनाचा स्वीकार केला. यावेळी यश सुलभा संजय खोडके यांच्या समवेत नवनिर्वाचित उमेदवार चंदूभाऊ खेडकर यांचे असंख्य समर्थक उपस्थित होते.




