शिवसेना शिंदे गटाचे दीपक दांदळेला एलसीबीच्या ताब्यात
10 लाखाच्या बनावट नोटा चलनात आणल्याच्या आरोवरुन कारवाई

* मुर्तीजापूर परिसरातील घटना
अकोला/21 डिसेंबर -: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुरात शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळेला नाशिकच्या एलसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या मालेगावात ऑक्टोबर महिन्यातील 10 लाखाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्यांना मालेगाव पोलिसांनी रंगेहात पकडलं होत.
तपासा दरम्यान राज्यबाहेरील तसेच अमरावती जिल्ह्यातील धारणीतील युवकाचा यात समावेश होता. धारणीतील त्या संशयित युवकाच्या कॉल सीडीआर’मध्ये मूर्तिजापूरातील शिंदे शिवसेनेचे ’तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे’ यांचा संपर्क दिसून आल्याने आज नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. गेल्या दोन तासापासून दांदळे यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, चौकशीनंतर दांदळे यांना नोटीस बजावून तपासकामी वेळोवेळी हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत. मात्र, नाशिकच्या पोलिसांनी शिंदेसेनेच्या तालुका प्रमुखाला बनावट नोटा प्रकरणात ताब्यात घेतल्याने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.




