देशद्रोही घुसखोरांना पाठिशी घालत आहेत

नवी दिल्ली– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आसाम येथे बोलत असताना काँग्रेस वर जोरदार टीका केली. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी आसाम आणि ईशान्येकडील राज्यांकडे दुर्लक्ष केले. तसेच या प्रदेशाची सुरक्षा आणि विशेष ओळख पुसून टाकत घुसखोरांना संरक्षण दिले, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. गुवाहाटी विमानतळावरील नवीन टर्मिनलचे उदघाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी एसआयआरला होत असलेल्या विरोधावरून इंडिया आघाडीवर टीका केली.




