उपमहापौरांनी दिली ‘गंगा सावित्री’ला भेट
राणांचा आशिर्वादाने करणार शहराचा कायापालट

* शहराला अतिक्रमण मुक्त करण्याचा केला निर्धार
अमरावती / 11 फेब्रुवारी – प्रतिनिधी अमरावती महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी नवनिर्वाचित झालेले सचिन भेंडे यांनी माजी खासदार नवनीत राणा यांची ’गंगा सावित्री’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नवनीत राणा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आत्मीयतेने स्वागत केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन काम करावे, त्याचबरोबर शहराला अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धारही यावेळी उपमहापौरांनी बोलून दाखविला.
अमरावतीच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून नवनियुक्त उपमहापौर सचिन भेंडे यांनी माजी खासदार नवनीत राणा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावेळी नवनियुक्त महापौर श्रीचंद तेजवानी यांचेही राणा यांनी स्वागत करून अभिनंदन केले. शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रभावी पावले उचलली जातील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. अमरावतीला विकासाची नवी दिशा देण्यासाठी परस्पर समन्वय महत्त्वाचा असल्याचे मत राणा यांनी व्यक्त केले. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान शहरातील प्रलंबित विकासकामे, नागरी सुविधा आणि भावी योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी गटनेते नाना उर्फ ज्ञानेश्वर आमले, नगरसेवक प्रा. प्रशांत आनंदराव वानखडे, सुमती ढोके, अजय मदनमोहन जयस्वाल, किशोर चंद्रशेखर जाधव, दीपक किसनलाल साहू, नंदा धनंजय सावदे, रजनी राजेश डोंगरे, गौरी शैलेंद्र मेघवानी, अॅड. प्रीती हर्षल रेवणे, महेश धर्मराज मुलचंदानी, योगेश रघुनाथ विजयकर, अर्चना अशोक पांडे, प्रियांका भूषण पाटणे यांच्यासह अविनाश काळे, शुभम उंबरकर, मंगेश कोकाटे, आकाश पाटील, मुकेश वासवानी, सचिन सोनोने आणि निखिल वावगे आदी उपस्थित होते.




