रायगडावरील रोपवे कंपनीची कामे अनधिकृत

नवी दिल्ली- किल्ले रायगडा वरील रोपवे कंपनीची कामे अनधि कृत अस ल्याचा आक्षेप संभाजीराजे छत्र पती यांनी घेतला आहे. याबाबत त्यांनी पुरातत्व विभागाकडून अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी महासंचालकांना निवेदन दिलं आहे. किल्ले रायगडावरील रोपवे कंपनी विरोधात संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. तक्रार देऊनही या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली नसल्याचे संभाजीराजे म्हणाले. किल्ले रायगडावरील रोपवे कंपनी ही गडावर अनधिकृत व्यावसायिक बांधकाम करत असून याबाबत आम्ही वारंवार भारतीय पुरातत्व विभागाकडे तक्रार करून ही कामे थांबविण्यासाठी नोटिसा दिल्या.




