राज्य सांस्कृतिक युवा पुरस्काराने संदिपपाल महाराज सन्मानित

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालयाचा उपक्रम

अमरावती /5 डिसेंबर – महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार तथा सत्यपाल महाराजांचे शिष्य संदिपपाल महाराज गिते ( रंभापुरकर) यांना 3 डिसेंबरला महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार 2024 उपस्थीत मान्यवरांचे हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
लोककला क्षेत्रात भरीव तसेच दिर्घ काळापासून समाजप्रबोधनाचे निरंतर कार्य संदिपपाल महाराज गिते यांचे आहे. याची दखल महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालयाने घेवून संदिपपाल महाराजांना सांस्कृतिक कार्य व महिती तंञज्ञान मंञी ड.आशीष शेलार यांच्या हस्ते राज्य युवा पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. पुरस्कारामध्ये त्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपञ, एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. पुरस्काराला संदिपपाल महाराज गिते, डॉ. रामपाल धारकर, विश्वजीत गिते आदींची उपस्थीती होती. संदीपपाल महाराजांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सप्तखंजेरी प्रबोधन संघ महाराष्ट्र राज्य , मिञपरिवार, गुरुदेव भक्तांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. माझे गुरु सत्यपाल महाराज यांचे वडील विश्वनाथजी चिंचोळकर यांचा 3 डिसेंबर स्मृतीदिन आहे. याच दिवशी मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. माझ्यासोबत कित्येकदा कार्यक्रमाला विश्वनाथजी चिंचोळकर उपस्थीत राहून त्यांनी त्यावेळेस बळ व प्रेम दिले. योगायोग त्यांच्या स्मृतीदिनी मला पुरस्कार मिळाला, हे सदैव ध्यानी राहिल व अजून ताकदिने या समाजजागृतीचे कार्य करेन, अश्या भावना संदिपपाल महाराज यांनी प्रस्तुत प्रतिनीधी जवळ व्यक्त केल्या.

संबंधित बातम्या

Back to top button