मदन महाराज विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकातर्फे वॉटर फिल्टरची सुविधा

स्व.इंदुताई महादेवराव कानफाडे स्मृती प्रित्यर्थ उपक्रम

अमरावती /3 जुलै: रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिका यांच्या सेवाभावी उपक्रमांतर्गत मदन महाराज विद्यालय, फुलआमला येथे विद्यार्थ्यांसाठी आर.ओ. वॉटर फिल्टर व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.धनंजय कानफाडे यांच्या आई स्वर्गीय इंदूताई महादेवराव कानफाडे यांचा स्मृती प्रीत्यर्थ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे औपचारिक अनावरण मंगळवार, दि. 30 जून 2026 रोजी करण्यात आले.
विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या सुविधेमुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाचे अध्यक्ष अमोल चवणे तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष देशमुख ,श्यामसुंदर मंत्री, रुपराव राऊत, अतुल कोल्हे,डॉ. पूजा कोल्हे,स्वप्निल करवा आदी मान्यवर उपस्थित होते. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिका सातत्याने सेवाकार्य करत असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. उपस्थितांनी या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.
यावेळी रोटरीचे सचिव डॉ. लोभस घडेकर, प्रकल्प प्रमुख डॉ. प्रवीण बोडखे,निलेश गाडबैल,सचिन राठोड, राजेंद्र पाटील, विनोद अवझाडे, अनुप विधळे, अरविंद राठोड, रवींद्र कवाने, सचिन बागेकर, पूनम पाठक, रेखा चेंडाळणे, शहाबाज लालूवाले, गजानन असोलकर, सुशील राऊत यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य, विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते

संबंधित बातम्या

Back to top button