22 फेब्रुवारीला नागपुरात भरणार एकात्मता महासंमेलन

संत नामदेव महाराज एकात्मता समितीकडून आयोजन

* शिंपी समाजाच्या विविध मागण्यांवर होणार मंथन

अमरावती / 18 फेब्रुवारी – राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात येत्या 22 फेब्रुवारीले शिंपी अन् दर्जी समाज बांधवांचा मोठा मेळावा होणार आहे. रेशिमबागच्या ऐतिहासिक मैदानावर ’संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासम्मेलन’ होणार असून या माध्यमातून पूर्ण भारताचा समाज एकवटणार आहे. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ’संत नामदेव महाराज विश्वरत्न’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. संतांच्या विचारांची शिदोरी आणि समाजाच्या हक्काची लढाई असं या कार्यक्रमाचं स्वरूप असेल. असल्याची माहिती भास्कर टोम्पे, अनंत जांगजोड, अविनाश ताठे, सारंग गचके, नरेश रामगिरी, नितीन ईश्वरे, रामदास खोंडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
या महासंमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, प्रल्हाद जोशी खा. प्रणीति शिंदे, पुण्याचे संजय नहार, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. संजय खोडके, आ. सुलभा खोडके, आ. रवी राणा, नवनीत राणा आणि प्रसिद्ध कलाकार गोविंदजी नामदेव आदी उपस्थिती राहणार आहे. सोबतच संत नामदेव महाराजांचे वंशज, ह.भ.प. जितेंद्रनाथ महाराज, स्वामी गोविंदगिरी महाराज आणि खंजरी वादक सत्यपाल महाराज आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करतील.
या महासंमेलनात समाजाच्या काही महत्वाच्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या जाणार आहे. त्यामध्ये संत नामदेव महाराजांचं नाव राष्ट्रीय महापुरुषांच्या यादीत टाकावं, पंढरपुरातल्या स्मारकाला लवकर निधी देऊन काम सुरू करावं, समाजाच्या पोराले शिक्षणात सवलत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह बांधून द्यावं, अशा मागण्या या मेळाव्यातून रेटल्या जाणार हाय. तसंच उद्योगात आणि राजकारणात बी समाजाले योग्य जागा मिळावी, यासाठी सर्व पदाधिकारी आणि राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र येऊन हुंकार भरणार हाय. हा सोहळा पूर्ण समाजासाठी एक दिवाळीसारखा सणच ठरणार हाय.

समाजाच्या प्रमुख मागण्यांवर एक नजर

संतांच्या यादीत नामदेव महाराजांचं नाव समाविष्ट करणे, पंढरपूर स्मारकाचं काम तातडीनं सुरू करणे, विद्यार्थ्यांना विशेष सवलती आणि शहरात राहण्यासाठी वसतिगृह देणे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी खास योजना राबवणे आणि उद्योगासाठी एमआयडीसीमध्ये हक्काची जागा मिळवणे, अशा मागण्यांसाठी हा महामेळावा ऐतिहासिक ठरणार असून समाजाची एकजूट दाखवणारा होय.

संबंधित बातम्या

Back to top button