डॉ.राजेंद्र गोडे एज्युकेशनल कॅम्पसमध्ये सोडेक्सोच्या पल्स कॅफेचे उद्घाटन

अमरावती /4 मार्च : डॉ. राजेंद्र गोडे एज्युकेशनल कॅम्पस, अमरावती येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोडेक्सो या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी द्वारे पल्स कॅफे या नव्या फूड सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन डॉ. राजेंद्र गोडे शैक्षणिक परिसर, अमरावती च्या सचिव मा. तन्वी गोडे मॅडम यांच्या हस्ते तसेच डॉ. राजेंद्र गोडे शैक्षणिक परिसराचे अध्यक्ष मा. श्री. योगेंद्रजी गोडे आणि संस्थेच्या उपाध्यक्षा सोनाली गोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. डॉ. राजेंद्र गोडे एज्युकेशनल कॅम्पसमध्ये अभि यांत्रिकी, एमबीबीएस, फार्मसी, बीएएमएस, नर्सिंग, डेंटल तसेच पॉलिटेक्निक अशा विविध शाखांचे महाविद्यालये कार्यरत आहेत. हजारो विद्यार्थी दिवसभर शिक्षण व प्रशिक्षणासाठी कॅम्पसमध्ये उपस्थित असतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ, सात्विक आणि संतुलित आहार उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पौष्टिक व दर्जेदार आहाराची सुविधा एकाच ठिकाणी मिळावी, तसेच त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. सोडेक्सो ही फ्रान्समधील अग्रगण्य कंपनी असून ती जगातील 50 हून अधिक देशांमध्ये फूड सर्व्हिस आणि कॅटरिंग मॅनेजमेंट क्षेत्रात कार्यरत आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि विविध औद्योगिक संस्थांना दर्जेदार आहार व सेवा सुविधा पुरविण्याचा कंपनीला मोठा अनुभव आहे. त्यामुळे संस्थेमध्ये सुरू झालेला पल्स कॅफे विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची सेवा देणारा ठरणार आहे. उद्घाटन सोहळा संस्थेच्या परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी महफिल हॉटेलचे संचालक प्रतीक मुंधडा, डॉ. राहुल अडवाणी तसेच जाधव इंडस्ट्रीचे मा. संचालक आपल्या कुटुंबियांसह उपस्थित होते. त्यासोबतच डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज चे डायरेक्टर डॉ. एस. एस. हटकर, डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज च्या डीन डॉ. सुधा जैन, डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर च्या प्राचार्या डॉ. उज्वला साखरकर, डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. प्रमोद बुरकले, डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. हरीगोपाल सावरकर, डॉ. राजेंद्र गोडे पॉलिटेक्निकच्या समन्वयक प्रा. दिपाश्री देशमुख, डॉ. नीरज मुरके, प्रा. अभिजीत शाहाडे, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.




