धक्कादायक! चिखदर्‍यात भूमकाकडून विद्यार्थिनीवर उपचार

सरकारी कर्मचार्‍याकडूनच अंधश्रध्देला खतपाणी

 डोमा आश्रमशाळेतील विद्यार्थीनींमध्ये मानसिक विकार

चिखलदरा /11 ऑगस्ट : मेळघाट मधिल डोमा शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहात घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर प्रशासन जागे होऊन वैद्यकीय मदत पुरवेल, अशी अपेक्षा होती; मात्र वस्तुस्थिती अत्यंत भयावह आणि संतापजनक वळणावर पोहोचली आहे. चिखलदरा तालुक्यातील डोमा शासकीय आश्रमशाळेत आजारी अल्पवयीन विद्यार्थिनीला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी थेट वसतिगृहाच्या आवारातच ’भूमका’ (स्थानिक पूजक) बाबाला पाचारण करून जादूटोणा आणि अघोरी पूजा-पाती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विज्ञानयुगात घडणार्‍या या अघोरी प्रकारामुळे मेळघाटातील अंधश्रद्धेचा पगडा किती खोलवर आहे, हे पुन्हा एकदा समोर आले असून प्रशासनाच्या संशयास्पद मौनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी वसतिगृहातील वातावरणाने भयभीत झालेल्या अनेक विद्यार्थिनी घरचा रस्ता धरून गेल्या होत्या. त्यापैकी एका बाधित अल्पवयीन विद्यार्थिनीला तिचे पालक व नातेवाईक पुन्हा वसतिगृहात घेऊन आले. मात्र, तिची प्रकृती खालावलेली असताना तिला रुग्णालयात नेण्याऐवजी अंधश्रद्धेचा खेळ मांडण्यात आला. एकताईच्या भूमका बाबाला वसतिगृहातच बोलावून मुलीवर कापूर ओवाळणे, कानात गूढ मंत्र पुटपुटणे आणि अघोरी पूजा करण्याचा प्रकार घडला

संबंधित बातम्या

Back to top button