15 व 16 मार्चला विभागात अवकाळी पावसाची शक्यता

अमरावती /12 मार्च : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा (मुंबई) यांच्या अंदाजानुसार अमरावती विभागातील काही जिल्ह्यांमध्ये 15 व 16 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार अमरावती विभागातील अमरावती, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. तसेच बुलढाणा व अकोला जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशी माहिती कृषी अधिक्षक अधिकारी डॉ. प्रशांत नाईक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी पिकांची कापणी, खत व कीटकनाशक फवारणी यांसारखी कामे करताना हवामान अंदाजाचा विचार करून नियोजन करावे.

संबंधित बातम्या

Back to top button